बरं झालं सई, तू माझं पहिलं बाळ आहेस! तू दिलेलं ‘आईपण’ मला जास्त आवडलंय!
सईच्या संगोपनात आम्ही दोघं आणि डे-केअरबरोबर गुगलचा मोठा वाटा आहे. अखंड ऊर्जा किंवा ‘डिमांडिंग’ स्वभाव, डे-केअरमध्ये वेगवेगळ्या वयाच्या इतर साठ-सत्तर मुलामुलींबरोबर वावरताना आत्मसात केल्या जाणाऱ्या बऱ्या-वाईट गोष्टी यामुळे कित्येक प्रसंगांत कोणतं वागणं जास्त योग्य ठरेल, हे जाणून घेण्यासाठी गुगलची मदत झाली.......